एकटा कन्हैय्या म्हणजे चळवळ नव्हता. कन्हैय्या चळवळीचा आऊटकम होता.

मागच्या काही वर्षात विद्यार्थी चळवळ संपूर्ण देशात एका आगळ्या लेव्हलवर पोहचली होती. हे वारे कन्हैय्या भोवती किंबहुना कन्हैय्याने निर्माण केले होते यात मात्र काही एक शंका नाही. माझ्यासारखे लाखो चळवळीत ओढले गेले ही देखील निर्विवादपणे त्याची एकट्याची किमया होती. सध्याच्या सत्तेचा तो सर्वात मोठा शत्रू होता ( आहे ) या बाबतीत भाजपाचे देखील दुमत नसावे. त्याच्या एकट्याला संपवण्यासाठी जितके कट रचले, जितका आयटी सेल मागे लावला तितके कष्ट अख्ख्या काँग्रेस विरोधात देखील घेतले नसावे. ४ लाख मतांनी लोकसभेला पडलेल्या कन्हैय्याचा खात्मा करण्यासाठी भाजपा इतकी उतावीळ का आहे याच प्रश्नात कन्हैय्याची ताकत दडली आहे.

आम्ही ज्या विचारधारेला मानतो त्या विचारधारेला देशाच्या राजकारणात आज नगण्य राजनैतिक प्रतिनिधित्व उरले आहे. असे असले तरीही आज डावे रस्त्यावर उतरतात. आजही एक नरेटीव्ह एस्टाब्लिश करण्याची ताकत डाव्यांकडे आहे. आंदोलन हा आमचा पिंड आहे. हे असे नसते तर आम्ही इतक्या विविध 'उपाध्यांचे' ( तुकडे तुकडे गँग, देशद्रोही, अर्बन नॅक्सल, अमुक तमुक ) मानकरी नसतो.

कन्हैया पुन्हा डाव्यांच्या नेतृत्वाला संदेश देतो आहे की तुम्ही जोवर पक्षाच्या अंतरंगात रिफॉर्म इनीशिएट करत नाही तोवर चळवळीचे विभाजन होत राहणार आहे.आज देशात पन्नास एक साम्यवादी पक्ष आहेत. कन्हैया गेल्याने कन्हैयापेक्षा पक्ष बॅकफूटवर जाणार आहे हे मात्र नक्की. बेगुसराई हे बिहारचे लेनिनग्राड म्हणवले जाते. तसेच हा मतदारसंघ भुमीहारांचा आहे. जातीय समीकरणे राजकारणात उमटतात. कन्हैया स्वतः भुमीहार असल्याने शक्यता नाकारता येत नाही की साम्यवाद्यांचा लेनिनग्राड ढासळणार आहे. नवीन नेतृत्व उचलत असल्याने जुन्या नेतृत्वाची होणारी घुसमट साम्यवादी विचारसरणीला सुरुंग लावत आली आहे. याच आंतरिक मतभेदांना चळवळ बळी पडत आली आहे हे दुर्दैव. राइस ऑफ ' राईट ' साठी याने पोषक वातावरण तयार केले आहे.


बाकी राजकरणात काही एक सायन्स नाही ती एक कला आहे. ( Politics is not science but an art ) कन्हैय्याचा निर्णय त्याच्या राजकीय कारकिर्दीला किंवा काँग्रेसच्या भवितव्याला काय वळण देणार आहे ही वेळच सांगेन. 

सुरवातीला लिहल्याप्रमाने ...

एकटा कन्हैय्या म्हणजे चळवळ नव्हता. कन्हैय्या चळवळीचा आऊटकम होता.

बाकी लढाई सुरू राहील, खऱ्या खुर्या आझादीचा सूर्य 

'लाल' क्षितिजावर उजाडत नाही तोवर.

जोपर्यंत समाजात गोष्टी ' राईट ' होत नाहीत तोपर्यंत 'लेफ्ट' राहील.

चळवळ संपल्याच्या आविर्भावात कुणीही राहू नये. या देशात अन्याय आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जोवर अन्याय होत आहे तोवर कॉम्रेड जन्म घेत राहणार आहे.


- केतन गजानन शिंदे ( राजन )

Comments